Amey khopkar

अमेय खोपकर यांची जीभ घसरली, राष्ट्रवादीवाले xxची औलाद, यांना लाजा नाही वाटतं?

ठाणे मनोरंजन महाराष्ट्र

ठाणे : मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरलीय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना अपशब्द वापरल्याची बातमी समोर आलीय. खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत”, अशा अर्वाच्य भाषेत अमेय खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलीय.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेतलाय. त्यानंतर राज्यातील सर्व मराठा संघटनांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल ठाण्याच्या एका मॉलमधील चित्रपटगृहात शिरुन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला होता. यावेळी एका प्रेक्षकाला प्रचंड मारहाण झाल्याचं देखील कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पण त्या प्रेक्षकाला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती का? ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी बंद केलेला शो पुढच्या अर्ध्या तासात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुरु केला होता.

मनसेकडून जितेंद्र आव्हाड यांच्या शो बंद पडण्याच्या कृत्याला आव्हान देण्यासाठी आज संध्याकाळी त्याच चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता.

यावेळी अमेय खोपकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले कि, तुम्ही आमच्या एका मराठी प्रेक्षकाला त्याच्या परिवारासमोर तुम्ही दहा-पंधरा जण मारतात? राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत. या लोकांना लाजा नाही वाटतं?”, असा घणाघात अमेय खोपकरांनी केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत