earthquake shakes north india including new delhi 6 dead in nepal
देश

नेपाळ भूकंपाने हादरला, ६ जणांचा मृत्यू, दिल्लीसह उत्तर भारतात जाणवले धक्के

नवी दिल्ली : नेपाळमधील दोती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणावले. 6.30 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली. नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 2 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळपाठोपाठ नवी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. मागील 24 तासांमध्ये 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सूत्राच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये पहाटे 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 4.9 तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. याआधी पहिला धक्का हा 6.3 तीव्रतेचा होता. एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दिल्ली एनसीआरसह उत्तर आणि पूर्व भारतात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणावले. नेपाळ सरकारच्या नॅशनल सिस्‍मोलॉजिकल सेंटरच्या नुसार, मागील 24 तासांमध्ये 2 वेळा भूकंप आला. तर एकदा आफ्टरशॉक धक्का जाणवला.

नेपाळमधील दोती जिल्ह्यात एक घर कोसळले. घराच्या ढिगाराखाली दबून 3 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरातही धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू हे जमिनीच्या खाली 10 किमी अंतरावर आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागडपासून 90 किमी. अंतरावर दक्षिण पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे.

मंगळवारी पहाटे देशात 4.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. दुसऱ्या भूकंपाचे केंद्रबिंदू काठमांडूपासून 155 किमी. उत्तर पूर्वमधील 100 किमी. परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. याआधीही 19 ऑक्टोबरला काठमांडूमध्ये 5.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनईएमआरसी)च्या नुसार 31 जुलैला काठमांडूमधील 147 किमी. दूर खोतांग जिल्ह्यात मार्टिम बिरता जवळ 6.0 तीव्रतेचा भूकंप आला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत