जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुलभ करण्यात आली आहे. जीएसटी नेटवर्कने (GSTN) कंपोजीशन टैक्सपेयर्स साठी ज्यांचं रिटर्न निल आहे, त्यांच्यासाठी एसएमएसद्वारे तिमाही परतावा भरण्याची सुविधा सुरू केली आहे. एकूण 17.11 लाख करदात्यांनी कंपोजिशन योजनेंतर्गत नोंदणी केली असून त्यापैकी 20 टक्के म्हणजेच 3.5 लाख करदाते निल रिटर्न्स मध्ये येतात.
याचा अर्थ असा की छोटे व्यापारी किंवा छोटे बिजनेस हाउस ज्यांना जीएसटीची थकबाकी किंवा कर देय नाही, ते आता एसएमएस पाठवून आपला जीएसटी परतावा फाईल करू शकतात. त्यांना जीएसटी पोर्टलला भेट देण्याची गरज भासणार नाही. तथापि, ज्या व्यापाऱ्यांना कर द्यावयाचा आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
करदात्यांना फॉर्म जीएसटी सीएमपी -08 मध्ये एसएमएसद्वारे NIL स्टेटमेंट भरता येईल, त्यांना जीएसटीएनच्या पोर्टलवर भेट देऊन प्रवेश करावा लागणार नाही. एसएमएसद्वारे टॅक्स रिटर्न कसे भरायचे, यासाठी जीएसटीएनने मार्ग देखील दर्शविला आहे.
एसएमएसद्वारे जीएसटी रिटर्न कसे भरावे :
- निर्धारकाला त्याच्या मोबाइलमध्ये ‘NIL <space>C8<space>GSTIN<space>Return Period’ असा मेसेज टाइप करावा लागेल आणि १४४०९ या क्रमांकावर पाठवावा लागेल.
- एसएमएस पाठविल्यानंतर करदात्यास त्याच्या मोबाइलवर 6 अंकी व्हेरीफिकेशन कोड मिळेल.
- हा 6 अंकी व्हेरीफिकेशन कोड पुन्हा १4409 या क्रमांकावर पाठवावा लागेल, जेणेकरुन NIL फॉर्म CMP-08 निश्चित होईल.
- त्यानंतर जीएसटी पोर्टल करदात्यांना त्यांच्या मोबाईल, ई-मेलवर Application Reference Number (ARN) पाठवेल.
- करदाता जीएसटी पोर्टलवर फॉर्म CMP-08 ची स्थिती पाहू शकतात, जिथे ते ‘Filed’ केलेले दिसेल.
- जर करदात्याने निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने एसएमएस पाठविला नसेल तर त्याचा रिटर्न भरला जाणार नाही.