IPL 2021 : आयपीएलच्या १४व्या हंगामात आज होणाऱ्या डबल हेडर मध्ये पहिला सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुपारी ३.३० वाजता तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रात्री ७.३० वाजता होणार आहे.
डबल हेडरमधील पहिल्या लढतीमधील पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यापैकी पंजाबचा एक सामन्यात विजय तर हैदराबादचा तिनही सामन्यात पराभव झाला आहे. गुणतालिकेत पंजाब एका विजयासह सातव्या स्थानावर असून हैदराबाद अखेरच्या स्थानावर आहे.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या लढतीत पराभव पत्करल्यानंतर सलग दोन सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाइट रायडर्स संघाने १ सामना जिंकला असून दोन सामने गमावले आहेत.




