आयपीएलचा 48 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबू धाबी येथे रंगणार आहे. दोन्ही संघ 14-14 गुणांसह टॉप-2 मध्ये आहेत. अशा परिस्थितीत आजचा एक विजय त्यांचे प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करू शकेल.
मागच्या वेळी दोन्ही संघात सामना झाला तेव्हा सुपर ओव्हर खेळावी लागली होती. दुबईत खेळल्या गेलेल्या दहाव्या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी राखून 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईनेही 5 गडी गमावून 201 धावा केल्या. शेवटी, बेंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत लीगमध्ये 198 सामने खेळले असून 116 विजय आणि 82 गमावले आहेत. त्याचबरोबर बेंगळुरूने आतापर्यंत 192 पैकी 91 सामने जिंकले आहेत आणि 97 गमावले आहेत. 4 सामन्याचा निकाल लागला नव्हता. मुंबईचा सक्सेस रेट 58.58% आणि बंगळुरुचा 48.13% असा सक्सेस रेट होता.
अबुधाबीमध्ये स्लो विकेट्स असल्यामुळे फिरकीपटूंना चांगलीच मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल.