IPL २०२० : ऋद्धिमान साहाने शानदार कामगिरी केली आहे. त्याच्या या खेळीचे कौतुक खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी केले. सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्स वर ८८ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात सनरायजर्सकडून ऋद्धिमान साहाने फक्त ४५ चेंडूत ८७ धावांची स्फोटक खेळी केली. साहा अशा पद्धतीच्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखला जात नाही. कसोटीपटू असा शिक्का त्याच्यावर असताना त्यांनी ही खेळी केली.
Very smart batting by @Wriddhipops!
Improvised his shots after picking the line and length of the ball. There was no slogging at all. Played a fantastic innings which I thoroughly enjoyed watching.#SRHvDC #IPL2020
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 27, 2020
या मॅचनंतर साहाची पत्नी रोमी मित्राने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले. इस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत ती म्हटली कि, ऋद्धिमान पटकन या प्रश्नाचे उत्तर दे, आज काय जेवला होतास?