IPL 2020 : CSK vs KKR चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली मॅच चेन्नई सुपर किंग्सने ६ विकेट्सने जिंकली आहे. . चेन्नईने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफसाठी पात्र ठरली.
चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 172 रन्स केले आणि चेन्नई समोर विजयासाठी 173 रन्सचं आव्हान दिलं. कोलकाताच्या टीमकडून नितीश राणा याने 87 रन्सची दमदार इनिंग खेळली. शुभमन गिल याने 26 रन्स केले. दिनेश कार्तिकने नॉट आऊट राहत 21 रन्स केले. इऑन मॉर्गनने 15 रन्स, रिंकू सिंगने 11 रन्स केले.
A nail-biting finish. @imjadeja finishes off in style ??#CSK win by 6 wickets.#Dream11IPL pic.twitter.com/eaoeT1cU4k
— IndianPremierLeague (@IPL) October 29, 2020
वॉट्सन याने 14 रन्स करत माघारी परतला. यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडू या दोघांनी टीमला सावरत चांगली पार्टनरशिप केली. अंबाती रायुडू याने 38 रन्स केले. यानंतर आलेला महेंद्रसिंह धोनी हा अवघा एक रन करुन आऊट झाला. ऋतुराज गायकवाड याने 72 रन्स केले. मग रवींद्र जाडेजा याने 31 रन्सची इनिंग खेळत टीमला विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्सच्या टीमकडून लुंगी नगीडी याने दोन विकेट्स घेतल्या. तर मिशेल सॅन्टनर, रवींद्र जाडेजा आणि करन शर्मा या तिघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्सच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारी पहिली टीम ठरली.. मुंबई इंडियन्सने प्लेऑफसाठी पात्र…
Presenting to you the first team to qualify for the playoffs of #Dream11IPL 2020 – #MumbaiIndians pic.twitter.com/2Q1vhdlJPk
— IndianPremierLeague (@IPL) October 29, 2020