BJP workers killed by terrorists
देश

दहशतवादी हल्ला : भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त

जम्मू-काश्मीर :  कुलगाम येथे दहशतवाद्यांनी तीन स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेला कुलगाम पोलिसांनी दुजोरा देत माहिती दिली आहे की, पीडितांमध्ये फिदा हुसैन यातू, उमर रमजान हाजम आणि उमर राशिद बैग या तिघांचा समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. त्यानंतर तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या या तिन्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

पोलिस म्हटले की, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, दहशतवाद्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा युवा सरचिटणीस फिदा हुसैन यातू, भाजप कार्यकर्ता उमर राशिद बैग आणि उमर रमजान हाजम या तिघांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. हे तिघेही वाईकेपूरा येथील निवासी होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा ट्विट करून निषेध केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत