जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या […]
टॅग: terrorist attack
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार, ६ जण जखमी
जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन पर्वताच्या शिखरावर पर्यटकांच्या एका गटावर दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रारंभिक माहितीनुसार, ट्रेकिंग ट्रिपसाठी गेलेल्या पर्यटकांवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये काही स्थानिक लोक आहेत आणि तीन पर्यटक आहेत. हा हल्ला आज सकाळी सुमारे […]
श्रीनगरमध्ये पोलिस बसवर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार, 14 जखमी, 3 गंभीर
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला. श्रीनगरच्या जेवान भागात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर गोळीबार केला. सध्या 14 जवान जखमी झाल्याची माहिती आहे, त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय राखीव पोलिसांच्या (IRP) 9व्या बटालियनची गाडी श्रीनगरमधील जेवानमधील पंथा चौक-खोनमोह रस्त्यावरून जात होती. […]
दहशतवाद्यांचा माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून केला अंदाधुंद गोळीबार… तीन जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात हरिपरीगाम येथे दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी विशेष पोलीस अधिकारी (SPO) आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली. फय्याज अहमद यांच्यासहीत त्यांच्या पत्नीची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात त्यांची अल्पवयीन मुलगी देखील गंभीर जखमी झाली होती. तिचादेखील उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली आहे. […]
भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या, माजी मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा […]
पुलवामा दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया..
भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली आहे. पाकिस्तानने यापूर्वी दहशतवादी हल्ल्यात आपला सहभगा नसल्याचं सांगितलं होतं पण आता त्यांनी कबुली दिल्यावर त्यांचा चेहरा सर्वांसमोर उघडा पडला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल […]
दहशतवादी हल्ला : भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त
जम्मू-काश्मीर : कुलगाम येथे दहशतवाद्यांनी तीन स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेला कुलगाम पोलिसांनी दुजोरा देत माहिती दिली आहे की, पीडितांमध्ये फिदा हुसैन यातू, उमर रमजान हाजम आणि उमर राशिद बैग या तिघांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. त्यानंतर तेथून पसार […]







