BJP leader Rakesh Pandit

भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या, माजी मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

क्राईम देश

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहिती नुसार, भाजप नेते राकेश पंडिता जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्याचा काम करत होते. पक्षात तरुणांना सामील करुन घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते राकेश पंडिता हे मुलगा ब्रज नाथसोबत काही कामाच्या निमित्ताने शेजारी राहणाऱ्या मुश्ताक अहमद यांच्या घरी गेले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी राकेश पंडिता यांच्यावर घरात घुसून गोळीबार केला. या घटनेत आसिफा मुश्ताक या तरुणीलाही गोळ्या लागली. आसिफा ही मुश्ताक अहमद यांची मुलगी आहे. दोघांना गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान राकेश पंडिता यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक सैन्यासह घटनास्थळी दाखल झालं आणि संपूर्ण परिसराला वेढा दिला. शोधमोहीम सुरु करण्यात आली परंतु हल्लेखोर दहशतवाद्यांचा कोणताही पुरावा सापडला नाही. राकेश पंडिता हे या परिसरातील भाजपचे मोठे नेते होते.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राकेश पंडित यांच्या मृत्यूच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या कि, भाजप नेते राकेश पंडित यांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्याची बातमी ऐकून धक्का बसला. हिंसाचाराच्या या मूर्खपणाच्या कृत्यामुळे जम्मू-काश्मीरचे दुःखच वाढले आहे. मी त्यांच्या कुटूंबियांबद्दल संवेदना व्यक्त करते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत