man murdered by accused who wants to kill his daughter in law

मुंबईत खळबळ! आईनेच केली मतिमंद मुलीची हत्या, नंतर केला मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव

क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबई : मुंबईतील अंधेरी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आईनेच आपल्या १९ वर्षीय मतिमंद मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तानुसार, अंधेरी येथील एका मानसिक आजारी मुलीची तिच्याच आईने गळा दाबून हत्या केली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेने मुलीला दोरीच्या साहाय्याने लटकवले आणि पोलिसांना फोन करून तिच्या मुलीने आत्महत्या केल्याचा दावा केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

त्यानंतर, शवविच्छेदन अहवालातून सर्व सत्य बाहेर आलं आहे. अहवाल समोर आल्यानंतर १९ वर्षीय तरुणीची दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीच्या आईला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत