Get PF at home in three days
देश

तीन दिवसांत घरबसल्या मिळवा पीएफ; जाणून घ्या ‘सोपी’ पद्धत…

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने ईपीएफ सदस्यांना त्यांच्या जमा रक्कमेपैकी 75 टक्के वाटा किंवा मूलभूत वेतन आणि तीन महिन्यांची महागाई भत्त्याची रक्कम काढून घेण्यास मान्यता दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या निधीमधून आगाऊ रक्कम काढून घेण्यास परवानगी दिली आहे. ही ईपीएफची रक्कम काढण्यासाठी पीएफ कार्यालयात जाण्याची अथवा कोणा एजंटची मदत घेण्याची आवश्‍यकता नाही. ही रक्कम तुम्ही घरबसल्या तुमच्या बॅंक खात्यात मिळवू शकता, तेही अवघ्या तीन दिवसांत…

कसा काढाल तुमचा ईपीएफ?

  1. सर्वप्रथम, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) ग्राहकाने ईपीएफ योजनेच्या पोर्टलवर (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/) लॉग इन करायचे आहे.
  2. लॉग इन झाल्यानंतर ग्राहकाने वेबसाइटच्या ऑनलाइन सेवा विभागात क्‍लेम फॉर्म 31 निवडावा. त्यानंतर सदर सदस्याने पीएफ खात्याशी जोडलेल्या बचत बॅंक खात्याच्या क्रमांकाचे शेवटचे चार अंक व्हेरिफाय करायचे असून त्यानंतर “Proceed” वर क्‍लिक करावे.
  3. एपीएफ सदस्याला Withdrawal Form दिसेल. त्या पानावर क्‍लिक करुन सदस्याने I Want to Apply या मजकूराच्या पुढील ड्रॉपडाऊनमधून “PF Advance’ पीएफ ऍडव्हन्स फॉर्म (अर्थात फॉर्म 31) निवडावा.
  4. सदस्याने पैसे काढण्याचा हेतू निवडायचा आहे. नव्या तरतुदीनुसार येथे ईपीएफ पोर्टलने ड्रॉपडाउन मेनूमध्ये “महामारीचा उद्रेक (कोविड -19)” हा एक नवीन पर्याय सादर केला आहे. सदस्याने तो पर्याय निवडणे आवश्‍यक आहे.

त्यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक माहिती भरल्यानंतर आपल्याला फक्त तीन दिवसांत PF चे पैसे मिळू शकतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत