Sushant Singh Rajput's sisters
मनोरंजन

सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींना होऊ शकते अटक, रिया चक्रवर्तीनं दाखल केली होती तक्रार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्याच्या बहिणी मितू सिंह आणि प्रियांका यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत रिया चक्रवर्ती हिनं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई पोलिसांनी या एफआयरची एक प्रत सीबीआयला पुढील तपास करण्यासाठी दिली असून, या एफआयरच्या आधारे सुशांतच्या बहिणींना सीबीआय अटक करू शकते. सुशांतच्या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयाकडं या प्रकरणी लवकर सुनावणीची विनंती केली आहे.

रियानं वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल केली आहे. रियानं सुशांतची बहिण प्रियांका हिच्यावर सुशांतचे ‘बोगस मेडिकल प्रिस्क्रिप्शन’ बनवून घेतल्याचा आरोप केला आहे. तर वांद्रे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील डॉक्टर तरुण कुमार यांचं नावदेखील आहे. त्यांची देखील चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.

रियानं तक्रारीत म्हटलं आहे कि, सुशांतसाठी देण्यात आलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये बदल करण्यात आले आणि ते प्रिस्क्रिप्शनही बनावट होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या बहिण आणि डॉक्टर यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीएस) कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेची डिलिव्हरी करणं), कलम ४६४ (खोटी कागदपत्र तयार करणं), कलम ४६५,४६६, ४६८, ४७८, ३०६ आणि १२० बी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.रियानं याआधी सात पानांची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर बारा तासांच्या आतच पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत