नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश त्यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे.असा प्रश्न जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हटले कि, कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच सांगत असतो. त्यात काही नवीन नाही. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्दत आहे. त्याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायच्या की स्वतंत्र हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. जो काही निर्णय असेल तो एकत्रितपणे घेतला जाईल.
आपल्याला राज्यात स्थिरता हवी आहे. राज्य नीट चाललं पाहिजे. भाजपाला बाजूला करण्यासाठी सगळे एकत्र आल्याने लोकांना चांगली फळं मिळालेली दिसत आहेत. याच पद्दतीनं राज्य करा, असा सल्ला यावेळी शरद पवारांनी दिला.