मुंबई : लोकल ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरच सुरु होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्य सरकारने अशी परवानगी देणारे पत्र रेल्वेला पाठवल्यानंतर रेल्वेने त्यावर तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत एक महत्त्वाचे ट्वीट मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे.
राज्य सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलत सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव रेल्वेपुढे ठेवला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त यांना हा प्रस्ताव देण्यात आला आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
Railways has always been ready to augment/enhance Suburban services keeping social distancing norms.
We are working closely with State Government of Maharashtra to provide these additional services after consultation with them.— Central Railway (@Central_Railway) October 28, 2020
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून मुंबई उपनगरीय लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास रेल्वे नेहमीच तत्पर आहे. लोकल सर्व प्रवाशांसाठी खुली व्हावी म्हणून आम्ही प्राधान्याने योजना तयार करत आहोत. राज्य सरकारसोबत याबाबत आम्ही सतत संपर्कात आहोत आणि लवकरच यावर अंतिम निर्णय होऊन अतिरिक्त लोकल सोडण्यात येतील, अशा आशयाचे ट्वीट मध्य रेल्वेने केले आहे.