IPL 2020 RCB vs MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेली मॅच मध्ये सूर्यकुमार यादवने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूने दिलेलं आव्हान मुंबई इंडियन्सने 19.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत गाठलं. या विजयासह मुंबईने १६ गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पटकावले.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या बंगळुरूच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावत 164 रन्स करत मुंबई समोर विजयासाठी 165 रन्सचं आव्हान दिलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमकडून देवदत्त पड्डीकल याने सर्वाधिक म्हणजेच 74 रन्स केले. जोशुआ फिलिप याने 33 रन्स, एबी डिव्हिलियर्सने 15 रन्स, गुरकीरत मान सिंग याने नॉट आऊट राहत 11 रन्स, वॉशिंग्टन सुंदरने नॉट आऊट राहत 10 रन्स केले.
That’s that from Match 48 as @mipaltan win by 5 wickets.@surya_14kumar with an unbeaten 79.
Scorecard – https://t.co/XWqNw97Zzc #Dream11IPL pic.twitter.com/ESHhCYRBik
— IndianPremierLeague (@IPL) October 28, 2020
मुंबई इंडियन्सच्या टीममधून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतल्या. बुमराहने 4 ओव्हर्समध्ये 14 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, पोलार्ड या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.