मुंबई : हार्दिक पांड्यासोबत भागीदारी करताना सूर्यकुमारने RCB च्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. हार्दिक पांड्यानेही त्याला उत्तम साथ देत मॉरिसच्या गोलंदाजीवर सुंदर षटकार खेचला. हा फटका खेळल्यानंतर हार्दिकने मॉरिसला काहीतरी बोलून डिवचण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुढच्याच चेंडूवर मॉरिसने हार्दिकला बाद करत आपला बदला घेतला. यावेळी माघारी परतत असताना हार्दिक आणि RCB च्या खेळाडूंमध्ये मैदानावर चांगलीच जुंपलेली पहायला मिळाली.
That’s that from Match 48 as @mipaltan win by 5 wickets.@surya_14kumar with an unbeaten 79.
Scorecard – https://t.co/XWqNw97Zzc #Dream11IPL pic.twitter.com/ESHhCYRBik
— IndianPremierLeague (@IPL) October 28, 2020
डगआऊटमध्ये बसलेला हार्दिक पांड्या रागातच दिसत होता. सूर्यकुमार यादवने विजयी चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी हार्दिकने डगआऊटमध्ये उभं राहून आपली आक्रमक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यावेळी सूर्यकुमारनेही मी आहे ना ! असं म्हणून हार्दिकला शांत करण्याचा प्रयत्न केला.