टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहूलने सर्वाधिक 51 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर रवींद्र जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 44 धावा ठोकल्या.
ऑस्ट्रेलियाकडून मोईसेस हेनरिकेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने 2 तर अॅडम झॅम्पा आणि मिचेल स्वीपसन या जोडीने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.