ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी सराव सामन्याकरता मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय संघातील आघाडीचे आणि मधळ्या फळीतील सर्व फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. ३ बाद १०२ वरुन भारतीय संघाची अवस्था ९ बाद १२३ अशी झाली. मात्र, जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. बुमराहने प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं आपलं पहिलं अर्धशतकही झळकावलं.
Jasprit Bumrah brings up his maiden first-class 50!
Watch live #AUSAvIND: https://t.co/7h4rdQDzHV pic.twitter.com/B0wSzob9Qj
— cricket.com.au (@cricketcomau) December 11, 2020
बुमराहने ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. ड्रेसिंग रुममध्ये परत येत असताना टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी जसप्रीत बुमराहला त्याच्या खेळीसाठी गार्ड ऑफ ऑनर देत त्याचं कौतुक केलं.
— A (@_shortarmjab_) December 11, 2020
मोहम्मद सिराजनेही २२ धावांची खेळी करत बुमराहला चांगली साथ दिली. याव्यतिरीक्त भारताकडून पृथ्वी शॉने ४०, शुभमन गिलने ४३ धावा केल्या. गोलंदाजीतही बुमराहने भारताला चांगली सुरुवात करुन देत ऑस्ट्रेलियाच्या जो बर्न्सला बाद केलं.