मुंबई : मनसे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर चार हल्लेखोरांनी तलवारीने वार केल्याची घटना घडली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जागेच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवारी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान राकेश पाटील पटेल आर मार्टजवळ उभे होते. त्याचवेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना खाली पाडत त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये पोटात आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने राकेश गंभीर जखमी झाले. उपचारासाठी पटेल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.