पुणे महाराष्ट्र

राक्षसी कृत्य! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण, प्राचार्यासह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही अटक

पुणे : निगडी येथे शिक्षकाने तेरा वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील दोन वर्षे हाच प्रकार सुरू होता. 21 ऑगस्टला पुन्हा शिक्षकाने पीडितेला त्रास दिला, यावेळी मुलीने घरच्यांना याविषयी माहिती दिली, त्यानंतर हा धक्क्कादायक प्रकार समोर आला. या विकृत शिक्षकाने 2018 मध्येदेखील शाळेतील एका मुलीशी असेच अश्लील चाळे केले होते, तेव्हा याला पॉक्सो (POCSO) अंतर्गत अटक झाली होती आणि सध्या तो जामिनावर बाहेर आला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

निगडी येथील एका नामांकित शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. काळभोर हा पिडीत मुलीचे वारंवार लैंगिक शोषण करत होता. विद्यार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जाताना व परत घेवून येताना पिडीत मुलीशी अश्लील चाळे करीत होता. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला खूप मारीन अशी धमकी देखील देत असे. 21 ऑगस्ट रोजी पिडीत मुलगी ही वॉशरूममधून बाहेर येत असताना या नराधमाने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर पीडित मुलीने घरच्यांना सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपी शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे. निवृत्ती देवराम काळभोर असं नराधम शिक्षकाचं नाव आहे, तर अशोक जाधव हे शाळेचे प्राचार्य आहेत, ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभिम जाधव, अविंद्र अंकुश निकम, गोरख, सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, लक्ष्मण नामदेव हेंद्रे पसार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत