Gang rape of a 14-year-old girl in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात धक्कादायक प्रकार, वाढदिवसाला बोलावून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पुणे : पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण येत असून त्यांनाही तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत असं तिला सांगण्यात आलं. पीडितेने याला विरोध केल्यानंतर, आरोपींनी तिच्या छातीवर गोळी झाडली. परंतु, तिथे मोबाईल ठेवलेला असल्यामुळे ती बचावली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने यातील एक आरोपी श्रीकांत काळे याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याची अधिक चौकशी केल्यानंतर 15 दिवसांपूर्वी झालेला सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्‍या 14 वर्षाच्या मुलीने दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणात हडपसर येथे राहणाऱ्या कृष्णा ऊर्फ रोहन ओव्हाळ(24) आणि वारजे माळवाडीतील निरंजन ऊर्फ निलेश शिंदे (२०) या दोघांना  अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या मैत्रिणी सोबत एका मित्राच्या वाढदिवसाला वारजे माळवाडी येथे गेली होती. वाढदिवसानिमित्त पार्टी असल्याचं सांगून 14 वर्षीय मुलीला बोलावलं. यावेळी वाढदिवस झाल्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण येत असून त्यांना तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे असल्याचे त्यांनी तिला सांगितले.

पीडित तरुणीने याला विरोध केल्यानंतर एका आरोपीने पिस्तूल काढली आणि तिच्या छातीवर गोळी झाडली. पण पीडित तरुणीने तिथे मोबाईल ठेवलेला असल्याने तिचा जीव वाचला. तिला थोडी दुखापत झाली. त्यानंतर या तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला कात्रज येथे सोडून देण्यात आले. तेथील एका रुग्णालयात जखमेवर उपचार घेऊन ती तरुणी घरी गेली. त्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत