babil khan borrows irrfan khan clothes for filmfare awards 2021 and accepted irrfan's awards

इरफान खान यांचे कपडे घालून मुलगा बाबिल खानने स्वीकारले त्यांचे पुरस्कार, म्हणाला…

मनोरंजन

मुंबई : दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खाननं दिवंगत वडील इरफान खान यांचे दोन पुरस्कार स्वीकारले. इरफान यांना ‘अंग्रेजी मीडियम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसंच त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानंसुद्धा सन्मानित करण्यात आलं. हे पुरस्कार स्वीकारताना त्यानं सांगितलं की, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यानं वडिलांचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी सर्वजण भावुक झाले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बाबिलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याची आई सुतापा बाबिलला या पुरस्कार सोहळ्यासाठी तयार करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ‘आई मला अवॉर्डसाठी तयार करत आहे.’ इरफान खानचा पुरस्कार घेताना बाबिल म्हणाला, ‘मी काही बोलावं अशी माझी ही जागा नाही. लोक नेहमीच म्हणतात की, माझ्या वडिलांच्या चप्पलमध्ये माझे पाय कधीच बसणार नाहीत. पण कमीत कमी त्यांचे कपडे मात्र मला फिट येतात. मी फक्त सर्वांचे आभार मानू इच्छितो. आमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आणि आम्हाला एवढं प्रेम देण्यासाठी.’

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये बाबिलनं लिहिलं, माझ्या बाबांना फॅशन शो आणि रॅम्प वॉकमध्ये भाग घेणं अजिबात आवडत नव्हतं. पण ते त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी शोमध्ये असे कपडे घालून सहभागी होत असत. मी सुद्धा काल रात्री तेच करत होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत