Director Filmmaker Sumitra Bhave
मनोरंजन महाराष्ट्र

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

पुणे : देवराई, दोघी, दहावी फ अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दहावी फ, एक कप च्या, वास्तुपुरुष, संहिता असे अनेक मराठी चित्रपट व हिंदी लघुपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुमित्रा भावे यांनी सुमारे १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांसाठी लेखन केले होते. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम. ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले.

पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्युनिटी अॅड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या. त्यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या होत्या. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या.

पुण्यात 12 जानेवारी 1943 मध्ये सुमित्रा भावे यांचा जन्म झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेत ग्रामीण विकास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. सुमित्रा भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये काम केलं. समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करत असतानाच त्यांनी लघुपट निर्मिती करण्यास सुरवात केली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत