Maharashtras first robotic knee replacement performed at sassoon hospital Pune

पुणे : ससून रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक गुडघा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे महाराष्ट्र

पुणे : संपूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करणारे शहरातील ससून जनरल हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. ही पुण्यातील सरकारी रुग्णालयाची मोठी उपलब्धी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर येथील ६० वर्षीय व्यक्तीवर ८ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रुग्णाला दोन्ही गुडघ्यांच्या गंभीर ऑस्टियोआर्थराइटिसचा त्रास होता. त्यांच्या डाव्या बाजूच्या गुडघ्यावर रोबोटिक आर्थ्रोप्लास्टी सर्जनने योग्य काळजी घेऊन ‘क्युव्हिस’ रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली, रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्ण आता बरा झाला आहे, त्याला लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ससून रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत