Husband murdered pregnant wife

सोलापूर : गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

महाराष्ट्र

चोरीचा बनाव करुन स्वत:च्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस बार्शी सत्र न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील मनिषा फुगारे हिचा खामसवाडी येथील महेश मिसाळ याच्याबरोबर 7 मे 2017 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहत होते. मनिषाला आपला पती सतत एका महिलेशी फोनवरुन बोलत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत तिने आपल्या माहेरी देखील सांगितले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

2 जानेवारी 2018 रोजी महेश मनिषाला घेऊन अचानक तिच्या माहेरी गेला. तिथून तो मनिषाला घेऊन बार्शीतल्या पाथरी येथे आपल्या बहिणीकडे गेला. संध्याकाळी परत येत असल्याचे मनिषाचे वडील दादाराव फुगारे यांना फोनवरुन सांगितले. मात्र उशीर झाला तरीही मुलगी-जावई न आल्याने दादाराव यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांचे फोन लागत नव्हते. त्यामुळे दादाराव नातेवाईंकासह त्यांना शोधण्यासाठी निघाले.

रात्री येरमाळ्याजवळ रस्त्याच्या कडेला जावयाची दुचाकी पडलेली आढळली. तिथे मनिषाचा मृतदेह देखील सापडला. मनिषाच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. मात्र महेश तिथे नव्हता. त्यामुळे त्यांनी जवळच असलेल्या पांगरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर त्यांना त्यांचा जावई उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल असल्याचे कळले. महेश याला विचारणा केली असता चोरट्यांनी आपल्यावर हल्ला केला. त्यात आपण जखमी झालो आणि मनिषाचा मृत्यू झाला असे त्याने सांगितले. मात्र हे प्रकरण पांगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन स.पो.नि. धनंजय ढोणे यांना शंकास्पद वाटले. महेशच्या अंगावर असणाऱ्या जखमा किरकोळ होत्या.

धनंजय ढोणे यांनी महेश मिसाळ याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. लग्नापूर्वीच नात्यातील एका मुलीसोबत आपले प्रेमसंबंध होते. तिच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र पत्नी मनिषा ही गर्भवती होती आणि ती लग्नाला अडसर ठरत होती. त्यामुळे डोक्यात दगड मारुन आणि चाकूने हल्ला करुन खून केल्याची कबुली आरोपी महेश मिसाळ याने कोर्टात दिल्याची माहिती सरकारी वकील अॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी दिली. या प्रकरणी एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता, मात्र केवळ परिस्थितीजन्य पुरावे व्यवस्थितपणे सादर केल्याने न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत