Massive fire at Mankhurd in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : मुंबईतील मानखुर्द येथे भीषण आग

मुंबई : मुंबईतील मानखुर्द येथे भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की, धुराचे लोट १० ते १५ फुट उंच जाताना दूरुन पहायला मिळत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानखुर्द मंडाला येथे तेलाच्या गोदामाला ही आग लागली आहे. तेलाच्या गोदामाला आग लागल्याने झपाट्याने आग आजुबाजूला पसरली आणि आगीने रौद्र रूप धारण केलं. ज्या ठिकाणी ही आग लागली आहे त्या परिसरात लाकडाच्या वखारी आणि भंगाराची गोदाम सुद्धा आहेत. तसेच जवळच रहिवासी परिसर आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत