मुंबई : चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तर ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने ओटीटी सेन्सॉरशिपवर प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. झोया अख्तरने यावेळी सेन्सॉर बोर्डावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
सिनेमातील अनेक बाबींवर सेन्सॉर बोर्डाचं बंधन येतं. पण ओटीटी माध्यमांवर तसं नाही. याबाबत झोयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यावर झोया अख्तरचे वडील जावेद अख्तर यांनी देखील तिला पाठिंबा दिला.
एक्सप्रेसोमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये झोया याविषयी बोलली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, पडद्यावर महिलांवर अत्याचार, शोषण आणि लैंगिक छळ पाहतच ती मोठी झाली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी पडद्यावर दाखवणे ठीक आहे. पण किसिंग सीन दाखवणं चुकीचं आहे. दोन तरुण मुलांमधील प्रेम आणि शारीरिक जवळीक पाहण्याची परवानगी द्यायला हवी, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे तिने म्हटलं की, ‘प्रत्येक चित्रपटाची कथा दाखवण्याची दिग्दर्शकाची पद्धत वेगळी असते. अशा परिस्थितीत रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तेथे दाखवण्यात आलेला हिंसाचार त्यांच्या काळाच्या खूप पुढचा होता. मग तुम्ही प्रेक्षकांना काय दाखवायचं आहे आणि जर आपण सांस्कृतिक फरकांबद्दल बोललो तर त्यामध्ये फ्रेंच अमेरिकन लोकांपेक्षा आपण खूप पुढे आहोत.
झोया अख्तरने आतापर्यंत ‘गली बॉय’, ‘दिल धडकने दो’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘लक बाय चान्स’ सारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.