‘बिग बॉस 13’ मधील स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ (विकास पाठक) जो आपल्या धाडसी व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे, आज भाऊच्या आईचं दुःखद निधन झालं. त्याची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. हिंदुस्थानी भाऊच्या आईचं वयही जास्त होतं. याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही.
“बिग बॉस” च्या घरात कित्येक महिने घालवलेल्या भाऊला टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना आकर्षित करता आले नाही. त्यानंतर तो “बिग बॉस” च्या घराबाहेर पडला. त्यानंतर भाऊने सांगितले की, “माझी तिथून बाहेर जाण्याची इच्छा होती म्हणून मी बाहेर आलो. मला माझ्या आईची खूपच आठवण येत होती आणि मला इतका वेळ तिच्यापासून दूर राहण्याची सवय नाही. मी तिचा मुलगा आहे परंतु मी तिची ती माझी मुलगी असल्याप्रमाणे काळजी घेतो. आणि मला माहित होतं की तिला मी घरात ठीक नाही म्हणून काळजी वाटेल. अन्यथा मला इतरांपेक्षा कमी मते मिळण्याची शक्यताच नव्हती. ”