'Sarabhai Versus Sarabhai' fame actress Tarla Joshi passes away
मनोरंजन

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन

मुंबई : अभिनेत्री तरला जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ यासह अनेक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनेत्री निया शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. नियाने तरला जोशी यांच्यासोबत ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेत काम केले होते. नियाने लिहिले कि, “तरला जी तू नेहमीच ‘बडी बिजी’ राहशील. तुझी खूप आठवण येईल.”

तरला जोशी यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी वेशभूषा डिझाईनर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘बंदिनी’ या मालिकांमध्ये तसेच ‘गांधी माय फादर’, ‘मजियारा है’ आणि ‘हम जो कह ना पाए’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत