मुंबई : टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे. कलम ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीचे स्टेटमेंट घेतले.
लग्नाचे आश्वासन देऊन कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. महिलेने बलात्काराचे आरोप केले तर आरोपीला एफआयआर नोंदवल्यापासून २४ तासांच्या आत चौकशीसाठी बोलावले जाते आणि आवश्यकता भासल्यास अटक केली जाते. या अभिनेत्रीने तक्रार नोंदवून ७२ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पोलिसांनी आयुष तिवारीला अटक केलेली नाही. दरम्यान, अभिनेत्रीच्या आरोपांप्रकरणी तपास सुरू आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.