मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांनी अनेक मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे. सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला होता. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी […]
टॅग: passed away
प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे निधन, मनोरंजन विश्वात खळबळ
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. मुंबईजवळील इगतपुरी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या काही तास आधी, नितेश यांनी त्यांच्या रिसॉर्टमधून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो हॉलिडे एन्जॉय करताना दिसला होता. नितेश उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी होते. नितेश पांडे यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा […]
हॅरी पॉटर फेम अभिनेते रॉबी कोल्टरेन यांचं निधन
स्कॉटलंड : हॅरी पॉटरमधील रुबेस हॅग्रीड ही भूमिका साकारणाऱ्या रॉबी कोल्टरेन यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. रॉबी कोल्टरेन यांच्या प्रवक्त्या बेलिंदा राईट यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्कॉटलंडमधील रुग्णालयात कोल्टरेनयांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, कोणत्या कारणामुळं निधन झालं हे त्यांनी सांगितलं नाही. १९९० च्या दशकातील क्रॅकरमधील डिटेक्टीव्हच्या भूमिकेमुळं रॉबी कोल्टरेन चर्चेत […]
समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन
लखनौ : समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी प्रदीर्घ आजारानंतर गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी सकाळी 8.16 वाजता अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह यादव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून, त्यांचे समर्थक आणि चाहते त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना करत होते. ३ वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे संरक्षणमंत्री […]
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, मनोरंजन विश्वाला मोठा धक्का
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज (७ ऑक्टोबर) निधन झाले आहे. अरुण बाली यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हा मनोरंजन उद्योगासाठी मोठा धक्का आहे. ते मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या दुर्मिळ दीर्घकालीन न्यूरोमस्क्युलर आजाराने ग्रस्त होते. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या ऊतींवर हल्ला करते. अरुण बाली […]
ब्रेकिंग! ‘सनम बेवफा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमार यांचे निधन
मुंबई : दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सनम बेवफा, सौतन, साजन बिना सुहागन या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. ते त्यांच्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत संजीव कुमार ते मेहमूद जूनियर उर्फ […]
ज्येष्ठ पत्रकार आणि माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे निधन
औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे आज (1 ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देवगिरी तरुण भारतचे संपादक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेले दिलीप धारूरकर यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. दैनिक तरुण भारत […]
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचे निधन
मुंबई : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या प्रसिद्ध मराठी टीव्ही शोमधील अभिनेते अरविंद धनू यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. अरविंद यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, अरविंद धनू सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण अरविंद […]
निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास
मुंबई : निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माधव गोडबोले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या पदांवर काम केले. प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते कायम सक्रीय होते. विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. तसंच प्रशासकीय सेवेत दाखल […]
प्रसिद्ध गीतकार माया गोविंद यांचे निधन, सुमारे 350 चित्रपटांसाठी लिहिली गाणी
मुंबई : अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी आज मुंबईत झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा अजय याने या वृत्ताला दुजोरा दिला. माया गोविंद यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या आणि त्यांना युरिन इन्फेक्शनसारख्या आरोग्याच्या समस्या होत्या. माया गोविंद यांच्या पार्थिवावर दुपारी ३ नंतर पवन […]