Harry Potter fame actor Robbie Coltrane has passed away

हॅरी पॉटर फेम अभिनेते रॉबी कोल्टरेन यांचं निधन

ग्लोबल मनोरंजन

स्कॉटलंड : हॅरी पॉटरमधील रुबेस हॅग्रीड ही भूमिका साकारणाऱ्या रॉबी कोल्टरेन यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. रॉबी कोल्टरेन यांच्या प्रवक्त्या बेलिंदा राईट यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्कॉटलंडमधील रुग्णालयात कोल्टरेनयांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, कोणत्या कारणामुळं निधन झालं हे त्यांनी सांगितलं नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

१९९० च्या दशकातील क्रॅकरमधील डिटेक्टीव्हच्या भूमिकेमुळं रॉबी कोल्टरेन चर्चेत आले होते. त्यांना ब्रिटीश अकादमी टेलिव्हिजनचा पुरस्कार सलग तीन वर्ष मिळाला होता. २००१ ते २०११ मध्ये आलेल्या हॅटी पॉटर फिल्मसमध्ये त्यांनी हॅरी पॉटरच्या मेंटरची भूमिका पार पाडली होती. जेम्स बाँड थ्रिलर्स गोल्डन आय आणि द वर्ल्ड इज नॉट इनफमध्ये देखील त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

रॉबी कोल्टरेन यांचा जन्म ३० मार्च १९५० ला स्कॉटलंडमध्ये एका शिक्षक आणि डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी ग्लासगोमध्ये झाला. त्यांचं मूळ नाव अँटनी रॉबर्ट मॅकमिलन होतं. ग्लासगो आर्ट स्कूलमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर एडीनबर्गमधील मोरेय हाऊस कॉलेज ऑफ एज्यूकेशन येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. एडीनबर्ग क्लबमध्ये त्यांनी स्टँड कॉमेडीचे कार्यक्रम केले. महान कलाकार जॉन कोल्टरेन यांच्या नावावरुन त्यांनी रॉबी कोल्टरेन या नावानं लंडनमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.

रॉबी कोल्टरेन यांनी विनोदी अभिनेता म्हणून अभिनयाला सुरुवात केली. रंगमंचावर देखील त्यांनी काम केलं. जेम्स बाँडच्या दोन चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अभिनय केला. २०१९ नंतर त्यांनी हॅग्रीडस मॅजिकल क्रिएचर्स मोटरबाइक अ‍ॅडवेंचर्समध्ये भूमिका केली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत