Retired Union Home Secretary Dr. Madhav Godbole Passed Away In Pune
देश पुणे महाराष्ट्र

निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

माधव गोडबोले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या पदांवर काम केले. प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते कायम सक्रीय होते. विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. तसंच प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी गोडबोले यांनी लेखनही केलं. डॉ. गोडबोले यांनी इंग्रजी आणि मराठीत सार्वजनिक धोरणविषयक समस्यांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी काही पुस्तके इंग्रजी भाषेत आहेत.

डॉ. माधव गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३६ रोजी झाला. गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. आणि पीएच्‌.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि मार्च १९९३ मध्ये केंद्रीय गृहसचिव आणि न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. तसंच त्याअगोदर डॉ. गोडबोले यांनी महाराष्ट्र शासनात मुख्य वित्तसचिव म्हणूनही काम केले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत