Hridaynath Mangeshkar Admitted To Hospital

हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

मनोरंजन

मुंबई : संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साधारणपणे १० दिवसांत वडिलांना घरी जाण्याची परवानगी मिळेल, अशी माहिती त्यांचा मुलगा आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यादरम्यान आदिनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, वडील हृदयनाथ नेहमी मनोगत व्यक्त करत आणि ट्रस्टबद्दल माहिती द्यायचे, पण यावर्षी ते रुग्णालयात असल्याने त्यांना तसे करता आले नाही.’ षण्मुखानंद सभागृहात आपल्या भाषणादरम्यान आदिनाथ म्हणाले, ‘देवाच्या कृपेने ते येत्या आठ ते १० दिवसांत घरी परततील. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत आहे.’

पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित होते आणि त्यांनी हृदयनाथ मंगेशकर यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी शुभेच्छा देऊन भाषणाला सुरुवात केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत