'Lapataganj' fame actor Arvind Kumar passed away due to heart attack
मनोरंजन

‘लापतागंज’ फेम अभिनेता अरविंद कुमार यांचे निधन, चाहत्यांना मोठा धक्का…

मुंबई : ‘लापतागंज’ फेम अभिनेता अरविंद कुमार यांचे 12 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अरविंद कुमार हे लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘लापतागंज’मध्ये चौरसियाच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. ‘लापतागंज’ शोमधील चौरसिया या सहाय्यक पात्रासाठी अरविंद लोकप्रिय होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सिंटाचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले कि, 12 तारखेला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद सध्या कामाच्या शोधात होते. कोरोनाच्या काळात काम न मिळाल्याने ते आर्थिक संकटाशी झुंजत होते.

‘लापतागंज’ या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये अरविंद कुमार यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. 5 वर्षे त्यांनी चौरसियाची व्यक्तिरेखा इतकी चोख बजावली की त्यांच्या चांगल्या अभिनयाची सर्वांनाच खात्री पटली. ‘लापतागंज’ व्यतिरिक्त त्यांनी ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे. टेलिव्हिजनशिवाय त्यांनी ‘चीनी कम’, ‘अंडरट्रायल’, ‘रामा क्या है ड्रामा’ आणि ‘मॅडम मुख्यमंत्री’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

अरविंद कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबीयांना हे मोठे दुःख सहन करण्याची हिंमत मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत