hollywood actress becomes male after a transgender surgery and shares picture in abs
ग्लोबल मनोरंजन

शस्त्रक्रिया करून पुरुष बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री , ६ पॅक ऍब्सचे फोटो केले शेअर

इलियट पेजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ६ पॅक ऍब्सचे फोटो शेअर केले आहेत. इलियटने टॉप शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर असा फोटो पोस्ट केला आहे, त्यात त्याचे 6 पॅक ऍब्स दिसत आहेत. चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रेटीही या फोटोवर कमेंट करीत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘इन्सेप्शन’, ‘जुनो’ आणि ‘द अंब्रेला अ‍ॅकॅडमी’ यासारख्या चित्रपटांची स्टार इलियट पेजने 26 जून 2013 रोजी टॉप शस्त्रक्रिया करवून घेतली होती, ज्यामध्ये त्याचे दोन्ही स्तन काढून टाकण्यात आले.

इलियटने ऑपेरा विनफ्रेला दिलेल्या मुलाखतीत या शस्त्रक्रियेचे वर्णन ‘लाइफ चेंजिंग’ आणि ‘लाइफ सेव्हिंग’ असे केले होते. तेव्हा तो म्हणाला होता की, “जेव्हा मी शस्त्रक्रिया केली तेव्हा मला असे वाटत होते की मला मीच पुन्हा एकदा सापडलो आहे.” या मुलाखतीत, इलियट पेज म्हणाला की त्याचे बालपण अगदी सामान्य होते, परंतु जेव्हा तो किशोरवयात पोहोचला तेव्हा शरीरातील बदल पाहून त्याला खूप अस्वस्थ वाटू लागले. काय करावे ते समजले नाही. एकीकडे हॉलिवूडमधील त्याचे करिअर वेगाने पुढे जात होते आणि दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप गडबड सुरु होती. महिलांच्या कपड्यांमध्ये त्यांना अजिबात आरामदायक वाटत नव्हते. ‘इन्सेप्शन’ चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान परिधान केलेल्या महिलांच्या कपड्यांमुळे तर त्यांना पॅनीक अटॅक येण्यास सुरुवात झाली होती आणि घाबरल्यासारखे वाटत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @elliotpage

इलियट पेजने शस्त्रक्रियेपूर्वी 2012 मध्ये त्याचे नाव बदलले. त्याचे नाव एलन पेज होते, ते बदलून इलियट पेज करण्यात आले.  एका वर्षानंतर त्याने टेस्टोस्टेरॉन घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर 2013 मध्ये त्याची शस्त्रक्रिया झाली. आज इलियट पेज त्याच्या आयुष्यात आनंदी आहे.

‘स्कूल ऑफ रॉक’ फेम अभिनेता केव्हिन क्लार्कचे अपघातात निधन, हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा

पॉप सिंगर लेडी गागाने केले धक्कादायक खुलासे, त्या व्यक्तीने धमकी देऊन केला बलात्कार आणि मग…

गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत