simple thumb tests can reveal if you are at risk of deadly heart problem

एक सोपी ‘थंब टेस्ट’ तुम्हाला सांगेल तुमचे हृदय निरोगी आहे की नाही? जाणून घ्या…

ग्लोबल तब्येत पाणी

वॉशिंग्टन : एका साध्या थंब चाचणीद्वारे (Thumb Test) आपल्याला हृदयाचा गंभीर आजार आहे की नाही, ते आपण शोधू शकता. येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील (Yale University School of Medicine) डॉक्टरांचे म्हणणे आहे की ही चाचणी खूप प्रभावी आहे आणि वेळेवर अचूक माहिती देण्यात मदत करते. या चाचणीद्वारे आपण लपलेल्या एओर्टिक एन्यूरिजम (महाधमनी रक्तविकार) ची काही समस्या आहे का ते शोधू शकता. महाधमनी रक्तविकार असल्यास धमनीच्या भिंती हळूहळू कमकुवत होऊ लागतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लवकर निदान करणे फार महत्वाचे :

रिपोर्टनुसार, महाधमनी आपल्या शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी आहे. तीच आपल्या हृदयापासून रक्त घेऊन शरीराच्या उर्वरित अवयवांना रक्त पुरवते. काही विशिष्ट परिस्थितींमुळे धमनीच्या भिंतींमध्ये बलून सारखी सूज उद्भवते, ज्यामुळे महाधमनीच्या भिंती कमकुवत होऊ लागतात, जे अत्यंत धोकादायक असते. तथापि, लवकर निदान झाल्यास धोका कमी होऊ शकतो.

एओर्टिक एन्यूरिजममध्ये सामान्यत: कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. केवळ स्क्रीनिंगद्वारेच याचे निदान होऊ शकते. परंतु, एखाद्या व्यक्तीला हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. ही सूज फुगवलेल्या बलूनइतकी मोठी होते. या अवस्थेत अंतर्गत रक्तस्त्राव आणि मृत्यू होण्याचीही शक्यता असते. हा सुजेचा बलून फुटल्याच्या घटनांमध्ये 10 पैकी 8 जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो.

चाचणी कशी करावी?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, थम्ब (अंगठा) टेस्ट करणे खूप सोपे आहे. यासाठी प्रथम हात वर करून तळहात पसरवा. यानंतर, अंगठ्याला करंगळीच्या बाजूला तळहाताच्या दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करा. जर अंगठा तळहात ओलांडून पुढे जात असेल, तर आपण डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधायला हवा. डॉक्टरांचे म्हणणे आहे की अशा प्रकारे अंगठा हलविण्यात सक्षम होणे, हा संबंधित व्यक्तीचे सांधे सैल असल्याचा एक अप्रत्यक्ष संकेत आहे. याव्यतिरिक्त, हे महाधमनीसह संपूर्ण शरीरात कनेक्टिव्ह टिशू रोगाचे लक्षण आहे.

305 लोकांवर चाचणी :

संशोधकांनी 305 लोकांवर थम्ब टेस्ट घेतली आणि अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. या संशोधनाचे ज्येष्ठ लेखक डॉ. जॉन ए एलेफर्टिअड्स (Dr John A Elefteriades) म्हणाले की, संशोधनादरम्यान असे आढळले की ज्या लोकांचा अंगठा सपाट तळहात ओलांडून पलीकडे जाण्यास सक्षम होता, त्यांना महाधमनी रक्तविकाराचा धोका होता. तथापि, त्यांनी असेही स्पष्ट केले की अशा लोकांमध्ये सूज फुटण्याच्या अवस्थेतच पोहोचली असेल असे नाही. त्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सहसा अनेक वर्षे लागतात.

दिलासादायक : कोरोनात चव न लागणं आणि वास न येणं हे चांगलं लक्षण, संशोधनातून समोर आली माहिती

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत