जगभरात कोरोनाचे रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदत मागितली होती.
भारताने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं लसीची मागणी केली होती. ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांनी तसं पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं. ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला प्रतिसाद देत भारतानं ब्राझीलला लस पुरवण्यास सुरूवात केली. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत.
“जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार,” असं बोलसोनारो यांनी म्हटलं आहे.
Namaskar, Prime Minister @narendramodi
Brazil feels honoured to have a great partner to overcome a global obstacle by joining efforts.
Thank you for assisting us with the vaccines exports from India to Brazil.
Dhanyavaad! धनयवाद
— Jair M. Bolsonaro (@jairbolsonaro) January 22, 2021




