भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? असं खळबळजनक विधान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलं आहे. देशातील प्रत्येक नागरिक कोरोनावरील लसीची वाट पाहत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी काल परवानगी देखील देण्यात आली आहे. इतर लसी परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत, त्यातच अखिलेश यादव यांचं वक्तव्य समोर आलं आहे.
मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही. असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या वक्तव्यानंतर हा डॉक्टरांचा आणि वैज्ञानिकांचा अपमान असल्याची चर्चा सुरु झाली आहे.




