एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण तो आयपीएलमध्ये खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये काहीही फरक पडलेला नाही आणि तो बऱ्याच जाहिराती करत आहे. आता धोनीबरोबरच त्याची मुलगी झिवा अॅडच्या दुनियेत पदार्पण करीत आहे. धोनी आणि झिवा हे दोघे एका बिस्किट ब्रँडची जाहिरात करताना दिसणार आहे. या अॅडमध्ये झिवा तिचे वडील धोनीसोबत दिसली आहे.
ज्या बिस्किट कंपनीसाठी झिवा तिच्या वडिलांसोबत जाहिरात करताना दिसली आहे, त्या कंपनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचा फोटो शेअर केला आहे आणि म्हटले आहे की, पाहा कोण मैदानात खेळायला आलं आहे.
View this post on Instagram




