दुबई : हैदराबादने तुफान फटकेबाजीच्या जोरावर २१९ रनाचा डोंगर उभा केला आहे. डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी केलेली झंजावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी यांच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. हैदराबादने केन विल्यमसनला संघात घेत जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर बसवले. प्रियम गर्गच्या जागी वृद्धिमान साहाला संघात घेत सलामीवीर-यष्टीकक्षक अशी दुहेरी जबाबदारी दिली. हैदराबादने फलंदाजीमध्ये केलेला हा प्रयोग पुरेपूर यशस्वी ठरला. वृद्धिमान साहाने सुरुवातीच्या दोन षटकांत दमदार फटकेबाजी केली. त्यानेच दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरूवात केली. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजीची जबाबदारी सांभाळत दिल्लीकरांना दणका दिला.
त्यानंतर साहाने तुफान फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हैदराबादच्या संघाकडून खेळताना वॉर्नर-साहा जोडीने अवघ्या ५२ चेंडूत (८.४ षटकांत) शतक गाठले. वॉर्नरने बाद झाल्यावरही साहाने फटकेबाजी केली. तो ८७ धावा करू शकला. मनिष पांडेने नाबाद ४४ धावा केल्या. तर विल्यमसनने नाबाद ११ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन आणि नॉर्ये यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.
Innings Break!
Some serious hitting from @SunRisers as they post a mammoth total of 219/2 on the board.#DelhiCapitals have a chase in hand.
Scorecard – https://t.co/RrbuyreAcF #Dream11IPL pic.twitter.com/xxlDrh8hJ8
— IndianPremierLeague (@IPL) October 27, 2020