Organizing Legal Service Week from 7th to 14th November

खेलरत्न, जीवनगौरव, द्रोणाचार्य, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन, अर्जुन पुरस्कारांकरिता खेळाडुंनी नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत

क्रीडा देश महाराष्ट्र

मुंबई : मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरिता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या नामांकनाकरिता नामनिर्देशन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हे प्रस्ताव दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत. विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज तसेच अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. या वर्षीपासून पात्र खेळाडुंनी या पुरस्काराकरिता मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. हे अर्ज भरताना कोणत्याही विभागाची अथवा व्यक्तींची शिफारस न घेता ते केंद्र शासनाच्या https://dbtyas-sports.gov.in/ या संकेतस्थळावर थेट सादर करावे. अर्ज संदर्भात नियमावली तसेच विहित नमुन्यातील अर्ज https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण असल्यास Department of sports च्या section.sp4-moyas@gov.in या ई-मेल किंवा 011-23387432 या क्रमांकावर कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत