नवी दिल्ली : रोहित शर्माला दुखापत झाली असून तो आयपीएलमधील गेली दोन सामने खेळू शकला नाही. इतक नव्हे तर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील रोहित शर्माचा विचार केला गेला नाही. रोहितला कसोटी, वनडे आणि टी-२० या तिनही संघातून दुखापतीमुळे वगळण्यात आले पण रोहितने जर फिटनेस सिद्ध केल्यास रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड होऊ शकते. रोहितसह इशांत शर्मा यांच्या दुखापतीवर बीसीसीआयच्या टीमचे लक्ष आहे.
भारतीय क्रिकेटसाठी आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स तसेच रोहितच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. पण आता रोहित शर्माच्या दुखापती संदर्भात एक अपडेट आली आहे. तो आठवड्याभरात पुन्हा एकादा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसू शकतो. मुंबई इंडियन्सला प्ले ऑफच्या आधी तीन सामने खेळायचे आहेत. त्यातील पहिली लढत २८ ऑक्टोबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध, ३१ ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तर ३ नोव्हेंबरल रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
Just what we love to see! Hitman in action at today’s training ?#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/FBYIyhtcOW
— Mumbai Indians (@mipaltan) October 26, 2020
रोहित शर्माच्या गैरहजेरीत केएल राहुल टी-२० आणि वनडे संघाचा उपकर्णधार असेल. त्याच बरोबर त्याला कसोटी संघात देखील स्थान देण्यात आले आहे. विकेटकिपर ऋषभ पंत देखील दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने राहुलला कसोटी संघात स्थान मिळाले आहे.