प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष आ.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी साखरेचे उत्पादन वाढवण्यावण्याबद्दल व साखरेला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री आ.श्री. आणासाहेब म्हस्के पाटील, जि.प. माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष श्री. नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय ढुस, गणेश कारखान्याचे अध्यक्ष श्री. मुकुंदराव सदाफळ, पं.स. सभापती नंदा तांबे, भाजीपाला सेवा संस्थेच्या अध्यक्ष गीता थेटे, ट्रक वाहतूक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर राठी, प्रवरा बँकेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब भवर, भाजपचे तालुका अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर गोंदकर, उपाध्यक्ष श्री. विश्वासराव कडू यांच्यासह सर्व संचालक, कामगार उपस्थित होते.