रशिया : रशियाच्या कझान शहरातील एका शाळेत घुसून हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 मुले आणि १ शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे. आपत्कालीन सेवेच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ला झाला तेव्हा दोन मुलांनी घाबरून तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. उंचीवरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
रशियाची वृत्तसंस्था RIA ने दिलेल्या वृत्तानुसार, एक हल्लेखोराने शाळेच्या चौथ्या मजल्यावर काही लोकांना ओलिस ठेवले आहे. 12 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेच्या आत एक स्फोट देखील झाल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा दलाने दोन हल्लेखोरांना ठार मारले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ठार झालेल्या एकाचे वय १९ वर्षे आहे. त्याच्याकडे रजिस्टर्ड बंदूक होती. घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी 17 वर्षांच्या एका संशयितालाही अटक केली आहे. या हल्ल्यात त्याचा हात असल्याचा संशय आहे. शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
At least one dead, one wounded in school shooting in Kazan’. One of shooter was reportedly detained by police. About 20 ambulances seen on the site https://t.co/T0mVIwWCrV #Russia pic.twitter.com/sTlElqnGzC
— Liveuamap (@Liveuamap) May 11, 2021




