नागपूर : एका विकृत व्यक्तीने एका खासगी शाळेतील सुमारे १७ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांमध्येही अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खाजगी शाळा आहे. शाळेजवळ स्टेशनरीचे […]
टॅग: school
शिक्षकावर विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, विद्यार्थ्याच्या नाका-कानातून रक्त…
पुणे : एका 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात शुक्रवारी एफआयआर दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी संगणकाचा वर्ग सुरु असताना या विद्यार्थ्याने शर्ट इन केला नसल्याचे शिक्षकाला आढळून आले, त्यानंतर आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या नाकातून आणि […]
उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाही, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना शाळा सुरू झाल्याबद्दल शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाही हा निर्धार करू या आणि आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया. मुख्यमंत्री उद्धव […]
शाळेत घुसून हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार, ८ विद्यार्थ्यांसह १३ जणांचा मृत्यू
रशिया : रशियाच्या कझान शहरातील एका शाळेत घुसून हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 मुले आणि १ शिक्षक असल्याचे सांगितले जात आहे. आपत्कालीन सेवेच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ला झाला तेव्हा दोन मुलांनी घाबरून तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. उंचीवरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रशियाची वृत्तसंस्था RIA […]
हैदराबादमधील गौलीपुरा येथे शाळेत भीषण आग, ५० विद्यार्थ्यांची सुटका
हैदराबाद : जुन्या शहरातील मुगल पुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौलीपुरा येथे श्रीनिवास हायस्कूलच्या दुमजली इमारतीत गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. सुमारे 50 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. वृत्तानुसार, शॉर्ट सर्किटमुळे तळमजल्यावर असलेल्या शाळेच्या प्रशासकीय कार्यालयात ही आग लागली. यात शाळेच्या नोंदी, पुस्तके व फर्निचर जाळून खाक झाले. […]
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात – डॉ.नीलम गोऱ्हे
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात. पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई, […]
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याविषयी दिली माहिती
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकारनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं. शाळा कधी सुरू होणार याविषयी अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं, “३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार शाळा सुरू करू शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील […]







