teacher booked for beating 11-year-old student
पुणे महाराष्ट्र

शिक्षकावर विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, विद्यार्थ्याच्या नाका-कानातून रक्त…

पुणे : एका 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात शुक्रवारी एफआयआर दाखल केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी संगणकाचा वर्ग सुरु असताना या विद्यार्थ्याने शर्ट इन केला नसल्याचे शिक्षकाला आढळून आले, त्यानंतर आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या नाकातून आणि कानातून रक्त वाहू लागले.

पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 115 (2) आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 च्या कलम 75 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत