गोवा : दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी गळती होत असल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या रुग्णालयात अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर दाखल झाला होता. त्यातून गळती झाली आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना ऑक्सिजन गळतीच्या घटना होत आहेत. हे दक्षिण गोव्यातील एक मोठं हॉस्पिटल असून येथे अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. ऑक्सिजन वेगाने टँकरमधून गळत आहे. या भागात सर्वत्र पांढऱ्या धुराचे लोट वाहताना दिलेत आहेत. गॅस गळतीमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, “भाजपशासित नासिकमधील ऑक्सिजन गळतीसाठी भाजप नेते महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरत होते. पण आता गोव्यातील ऑक्सिजन गळतीबाबत सत्ताधारी भाजपला आणि इतर बीजेपी नेत्यांना काय म्हणायचे आहे?”
.@BJP4Maharashtra leaders kept blaming MVA govt for oxygen leakage in Nasik although hospital where that incident took place was under BJP ruled Nasik corp. What do @mipravindarekar and other bjp leaders have to say now on oxygen leak in BJP ruled Goa?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 11, 2021




