pm kisan installment latest update pm narendra modi will announce
देश शेती

मोठी बातमी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान योजनेचा 8 वा हप्ता मिळण्याची तारीख निश्चित झाली आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर पंतप्रधान मोदी किसान योजनेचा पुढील हप्ता जारी करतील. हा कार्यक्रम https://pmindiawebcast.nic.in/ वर दाखविण्यात येईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याआधीच्या मीडिया रिपोर्टनुसार, राज्य सरकारांनी RFT (Request For Transfer) वर स्वाक्षरी केली आहे आणि केंद्र सरकारने एफटीओ (फंड ट्रान्सफर ऑर्डर) तयार केला आहे. बर्‍याच शेतकर्‍यांच्या खात्यात Rft Signed by State For 8th Installment असे स्टेटस दिसत आहे. जर आपण पंतप्रधान किसान योजनेत नोंदणी केलेली असेल, तर आपण आपले स्टेटस PMkisan.gov.in वर तपासू शकता.

आपले नाव अशाप्रकारे तपासा :

  1. पंतप्रधान किसान सन्मान निधी PMkisan.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा.
  2. उजवीकडे ‘Farmers Corner’ दिसेल.
  3. ‘Farmers Corner’ मध्ये ‘Beneficiary List’ चा पर्याय उपलब्ध असेल.
  4. ‘लाभार्थी यादी’ (Beneficiary List) पर्यायावर क्लिक करा.
  5. येथे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक ड्रॉप डाऊन सूचीतून निवडा. गाव निवडा.
  6. आता Get Report वर क्लिक करा. आता या योजनेच्या लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येईल.
  7. ही यादी वर्णक्रमानुसार (अल्फाबेटिकल) असते. ही यादी अनेक पानांची असते. यात खालच्या बाजूला असलेला पर्याय वापरून पेज बदलून आपले नाव पाहू शकता.
  8. याद्वारे आपण पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता आपल्याला मिळणार की नाही याची खात्री करुन घेऊ शकता.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत